माझ्या तमाम मराठी बंधुंनो, भगिनींनो आणि मातांनो...

माझ्या तमाम मराठी बंधुंनो, भगिनींनो आणि मातांनो,
आज आपल्या समोर येण्याचे कारण म्हणजे आज आपल्या पक्षाचा, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ५ व्या वर्धापन दिन..
९ मार्च २००६ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाली.. आणि बघता बघता हा पक्ष अवघ्या महाराष्ट्रात वणव्यासारखा पसरला...


पक्षाची स्थापना करण्यामागचा उद्देशच हा आहे कि महाराष्ट्रात मराठी माणसाचे गोमटे करायचे. त्यामुळे जेव्हा मी पक्ष स्थापनेचा विचार करत होतो तेव्हा पहिला विचार माझ्या मनात आला कि माझ्या पक्षात काम करणारा जो कार्यकर्ता असेल त्याच्या घरी त्याची आई, त्याचे वडील, त्याची बहिण, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्याची मुले.. या सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान असले पाहिजे कि हा राज ठाकरे बरोबर आहे,, हा कुठेही फुकट गेला नाही पोरगा माझा...


मी आज पर्यंत जे काही लढे, आंदोलने केली ती फक्त महाराष्ट्र हितासाठीच आहेत कारण इतर राजकारण्यांकडून काही होईल असे मला तरी वाटत नाही.. म्हणूनच तर नवीन पक्ष काढायची वेळ आली.. नाही तर कशाला मी उपद्व्याप करत बसलो असतो..??
मी जे करतोय.. ते जर उद्या कुठल्याही पक्षाने केले आणि महाराष्टाचा विकास केला तर मी पक्ष बंद करून टाकेन.. पण मला माहित आहे हे त्यांच्या हातून होणार नाही...
अहो जे ४७ वर्षात नाही झाले ते आत्ता होणार आहे..
त्यामुळे मी जे काही आंदोलने हाती घेईन ते तुमच्या लक्षात येतीलच.. आणि यापुढची माझी जी कोणती आंदोलने असतील ती एकतर बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला याच धोरणाची असतील...
हा माझा महाराष्ट्र इतका मोठा व्हावा, इतका प्रगत व्हावा कि संपूर्ण जगाला त्याचा हेवा वाटावा..असा महाराष्ट्र आपण घडवूया..
आपण जे प्रेम, जी निष्ठा आणि जो विश्वास माझ्यावर ठेवलात त्याला आयुष्यात भविष्यात मी जरा देखील तडा जाऊ देणार नाही इतके आपण सगळ्यांनी नीट लक्षात ठेवावे...
मनसे ची घोडदौड पाहता उद्या संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता माझ्या हाती येईल यात तिळमात्र शंका नाही.. पण उद्या जेव्हा कधी मी महाराष्ट्राच्या सत्तेला हात घालीन तेव्हा महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट माझ्या हातात असेल.. तेव्हा डोक खाजवत नाही बसणार कि आता काय करायचे........
मी जास्त आपला वेळ घेणार नाही.....आपल्या सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या आणि प्रगतीशील महाराष्ट्राच्या शुभेच्छा देवून आणि हे शुभ कार्य माझ्या हातून घडो हि प्रार्थना करून आपल्या सर्वांची मी रजा घेतो,,,

जय हिंद, जय महाराष्ट्र..

महाराष्ट्र नवनिर्माण सेना | MANASE|MAHARASHTRA NAVNIRMAN SENA|RAJ THACKERAY