I love my Dad Story Written By Nitin Sirsat

एक मुंबई मध्ये राहणार साधारण कुटुंब. कुटुंबा मध्ये नवरा त्याचे नाव नितीन बायको तिचे नाव श्रद्धा त्यांची ३ वर्षाची मुलगी तन्वी आणि त्याचे आई बाबा. नितीन एका मल्टि नॅशनल कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीरयर श्रद्धा गृहणी व त्याचे वडील रिटायर्ड सरकारी कारकून खूप जीवाचे हाल करून त्यांनी नितीन ला शिकवलं. नितीन ने त्याच्या मनाने लग्न केलं म्हणून त्याच्या आई च आणि श्रद्धा च पटत नव्हतं . नेहमी काही ना काही दोघी मध्ये सुरु असायचं. नितीन ला रोज लोकल चा प्रवास हा प्रवास त्याला खूप कंटाळवाणा वाटायचा त्या मुळे घरी आला कि चीड चीड सुरु व्हायची पण तन्वी जवळ आली कि सर्व विसरून तिच्या सोबत गप्पा गोष्टी हसन खेळणं सुरु असायचं.

नितीन ला त्याच्या कंपनी मध्ये बढती मिळाली आणि आता त्याचा पगार पण छान वाढला होता. नितीन ला नवीन कार घायची होती त्या साठी त्याने शो रूम ला विचारपूस केली आणि कार च फायनल झालं आणि बुकिंग केली.गाडीच फायनान्स पण पास झालं एका महिन्या नंतर नवीन कोरी करकरीत गाडी दारासमोर उभी होती सर्व आनंदी होते. नितीन ऑफिस ला जाण्याच्या अगोदर रोज तन्वी ला घेऊन कार धुवायचा आणि पुसायचा हा त्याच्या नित्यक्रम झाला होता. ऑफिस वरून घरी आला कि जेवणा नंतर सर्वाना फेरफटका आणि आईस्क्रीम. सर्व काही सुरळीत सुरु होत. जवळपास ६ महिने हा नित्यक्रम चालला.

रविवार दिवस होता सकाळी उठून तन्वी ला घेऊन गाडी स्वच्छ करायला निघाला त्याच्या लक्षात आला कि कार चा समोर चा टायर पंचर आहे तो घरा मध्ये गेला आणि टूल किट घेऊन आला तो टायर बदलवत होता आणि तन्वी पेचकस घेऊन गाडी मागे गेली. थोड्या वेडाने नितीन च्या लक्षात आले कि कर.. कर...कर.. आवाज येत आहे तो डाव्या साईड वरून उजव्या साईड ने गेला आणि बघतो तर काय तन्वी चक्क पेचकस ने काही तरी ओरखडत होती. त्याला खूप राग आला आणि हात मधली पकड त्याने फेकून मारली आणि चुकीने ती तन्वी च्या डाव्या हाताच्या करंगळी ला लागली. व तिच्या करंगळी मधून रक्त वाहू लागल. तो तिला घेऊन दवाखान्या मध्ये गेला सर्व जण जमा झालेत. सर्व जण रडत होते व मनातल्या मनात नितीन सुद्धा खूप रडत होता. १ तास झाला डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले कि तन्वी ची करंगळी आम्ही वाचऊ नाही शकत ती हातापासून ८० टक्के वेगळी झाली आहे. श्रद्धा जीवाचा आकांत करत होती आणि खूप रडत होती. नितीन ला खूप पच्छाताप झाला होता रागाने त्याच्या मुलीची करंगडी घेतली होती.

१ आठवडा नंतर तन्वी ला रजा मिळाली. या १ आठवड्या मध्ये नितीन ने कार कडे पाहले सुद्धा नाही. तन्वी नितीन ला पप्पा चला ना आपण कार क्लीन करू म्हणून हट्ट करायला लागली नाईलाजाने तो तिला घेऊन कार जवळ गेला कार साफ करू लागला डावी बाजू झाली आता उजव्या बाजूला साफ करू लागला त्याला ते ओरखडे दिसले त्याने ते क्लीन केले आणि बघतो तर काय तन्वी ला जवळ घेऊन खूप खूप रडू लागला तिला काही कडेना. कारण त्या ओरडखड्याने लिहले होते I love my Dad .

तात्पर्य असे आहे कि आपण काही काही गोष्टी ला आपल्या माणसा पेक्षा जास्त महत्व देतो. नितीन कार पुन्हा घेऊ शकतो पण तो त्याच्या मुलीची करंगडी वापस नाही आणू शकत. राग हा माणसा चा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून रागा वर नियंत्रण करा.

1 comments:

  1. RAT SMS is the best choice for businesses seeking faultless communication solutions. We provide a broad range of bulk SMS services, from transactional SMS for immediate notifications to successful SMS marketing campaigns that boost customer engagement. RAT SMS is reliable for sending and receiving messages quickly, securely, and effectively.

    ReplyDelete