skip to main |
skip to sidebar
Home »
Unlabelled »
मराठी भाषा, संस्कृती व मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना..
Posted by Nitin Sirsat
Thursday, September 23, 2010
0 comments
नमस्कार मराठी बंधु-भगिनींनो,
मराठी भाषा, संस्कृती व मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करत आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हे पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. या दृष्टिकोनातून पक्ष वेगवेगळ्या पातळीवरून प्रयत्न करत आहे. विविध क्षेत्रांत ‘मराठीचा वापर व सन्मान’ यासाठी पक्ष आंदोलने करतो आहे, कार्यक्रम- उपक्रम-प्रकल्प राबवतो आहे.
नुकतीच पक्षाध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बहुचित्रपटगृहांत (मल्टिप्लेक्समध्ये) मराठी चित्रपट अधिक प्रमाणात दाखवावेत अशी आग्रही मागणी केली. चित्रपटसृष्टीची जननी असलेल्या महाराष्ट्रातच मराठी चित्रपट कमी प्रमाणावर दाखवले जातात. तसेच दर्जेदार नाटकांची परंपरा असलेल्या नाट्यक्षेत्राकडे मराठी माणूसच पाठ फिरवत आहे. निर्माते, दिग्दर्शक व अन्य मराठी कलाकार चित्रपट व नाटकांच्या माध्यमातून अनेक चांगले विषय, उत्कृष्ट सादरीकरणासह सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु बहुचित्रपटगृहांत मराठी चित्रपट खूपच कमी प्रमाणात दाखवले जातात. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांकडून मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष केले जाते. या पार्श्वभूमीवर मा. राज ठाकरे यांनी ’बहुचित्रपटगृहांनी मराठी चित्रपट दाखवावेत‘, अशी सूचना केली आहे. तसेच मराठी रसिक-प्रेक्षकांनी चित्रपट व नाटकांना उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.
मराठी भाषा, संस्कृती, साहित्य ह्या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत, तशाच लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या पायाभूत सोयीसुविधादेखील महत्त्वाच्या आहेत. रस्ते, वीज, आरोग्य, वाहतूक या विषयांवरही मा. पक्षाध्यक्षांचे व पक्षाचे लक्ष आहे. मुंबईतील (तसेच अन्य मोठ्या शहरांतील) लोकांना रोज वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. मुंबईतील विस्कळीत झालेल्या वाहतुकीच्या संदर्भात मा. राज ठाकरे यांनी वाहतूक शाखेचे आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. शहरातील वाहतुकीचा प्रश्न, भाडे नाकारणारे टॅक्सी व रिक्षाचालक, विनापरवाना रिक्षा-टॅक्सी चालवणारे, एकाच परवान्यावर अनेक रिक्षा-टॅक्सी अशा विविध समस्यांबाबत मा. अध्यक्षांनी विवेक फणसळकर यांच्याशी चर्चा केली. तसेच टॅक्सी/रिक्षा चालकाची सर्व माहिती त्याच्या छायाचित्रासह टॅक्सीत/ रिक्षात असावी, विनापरवाना टॅक्सी/रिक्षा चालवणार्यांच्या विरोधात कारवाई करावी अशा अनेक मागण्या मा. राज ठाकरे यांनी यावेळी केल्या. त्याचबरोबर टोल वसूल करणार्या ठेकेदारांनी संबंधित रस्त्यांवर पडणार्या खड्ड्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. एखादा मोठा अपघात झाल्यास या टोल वसूल करणार्या कंपन्यांनी क्रेन, रुग्णवाहिका, अग्निशमन यांसारख्या अन्य साधनसुविधाही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली. याच मागण्या घेऊन मा. पक्षाध्यक्ष परिवहन आयुक्त दिलीप जाधव यांनाही भेटले.
वरील दोन्ही विषयांबाबत पक्षाध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी मांडलेल्या मतांकडे आपण आवर्जून लक्ष द्यावे, ही विनंती. मा. राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण जास्तीत-जास्त मराठी चित्रपट व नाटके पाहावीत. त्यामुळे मराठी भाषा, साहित्य, वाड्:मय व चित्रपट - नाट्य क्षेत्रे सर्वार्थाने वृद्धिंगत होतील. तसेच वाहतूकविषयक समस्या सोडविण्यासाठी आपण प्रत्येकानेही प्रयत्न केले पाहिजेत. आपली नागरी कर्तव्ये पार पाडायला हवीत. वाहतुकीसंदर्भात काही समस्या असेल, तर ती आपण स्थानिक कार्यकर्त्यांना जरूर दाखवून द्यावी. तसेच स्थानिक समस्या (योग्य तपशीलासह ) संकेतस्थळाच्या माध्यमातून आमच्याकडे जरूर पाठवावी.
आपला नेहमी संवाद-संपर्क असतोच, आपले सहकार्यही असतेच. असेच सहकार्य कायम मिळावे ही नम्र अपेक्षा!
0 comments:
Post a Comment